माझी मराठी शाळा आपले सहर्ष स्वागत करीत आ

Pages

Thursday, March 10, 2016

कथा

🌹गुणाची पारख🌹
एक प्रसिद्ध चित्रकार एका मोठ्या माणसाचे शिफारस पत्र घेऊन नेपोलियन कड़े गेला, त्याचा गबाळा पोशाख पाहून नेपिलियनचे त्याच्या विषयी प्रथम दर्शनी फारसे चांगले मत झाले नाही, त्याने त्यास बसन्यास सांगितले व तो आपल्या कामास निघून गेला। काम अटो पल्यावर तो बऱ्याच वेळाने परत आला।तोपर्यंत तो चित्रकार तसाच ताट कळत बसून होता.चित्रकार मनातून अस्वस्थ झाला होता. नेपिलियनने जरा नाखुशीनेच बोलण्यास सुरवात केली. पण त्याच्याशी बोलताना त्याची प्रखर बुद्धिमत्ता, चित्रकलेतील त्याची असामान्य  माहिती पाहून नेपोलियन प्रभावित झाला. चित्रकाराला निरोप देताना नेपोलियन स्वतः त्यास दारापर्यंत पोचवन्यास गेला. ते पाहून चित्रकार आश्चर्याने म्हणाला."मी आलो तेव्हा आपण माझ्याकडे धड पाहिले देखील नाही. आणि आता पहावे तर आपण स्वतः दारापर्यंत मला पोहचवन्यास येत आहात, हे कसे?"  नेपोलियन हसून म्हणाला,"मित्रा त्याचे असे आहे, येताना मनुष्याचा जो सत्कार करतात तो त्याच्या पोशाखा वरुन, जाताना जो सत्कार  होतो तो त्याच्या गुणावरुन"


No comments:

Post a Comment