माझी मराठी शाळा आपले सहर्ष स्वागत करीत आ

Pages

Delete Photo Recovery

    अँड्रॉइड फोनवर डिलिट झालेले गुगल फोटोज रिकव्हर कसे कराल 


          जगभरा गुगल फोटोज चा वापर ऑनलाइन बॅकअपसाठी केला जातो. ऑनलाइन उपलब्ध असलेली ही सर्वात बेस्ट अशी सेवा आहे. यावरूनही तुमचे फोटो चुकून डिलिट होऊ शकतात. मात्र हा डेटाही रिकव्हर करता येतो. यासाठी काही ट्रिक्स अँड्रॉइड़, आयओएस आणि पीसीवरून वापरता येतात. पण डिलिट झालेले फोटो मिळवण्यासाठी वेळेची मर्यादा आहे. फोटो डिलिट झाल्यानंतर दोन महिन्यांनी ते रिकव्हर करण्यासाठी अडचण येऊ शकते.
अँड्रॉइड फोनवर डिलिट झालेले गुगल फोटोज रिकव्हर करणं सोपं असतं. गुगल फोटो ओपन केल्यानंतर त्यात ऑप्शनमध्ये Trash किंवा Bin पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर काही फोटोज दिसतील. त्यातील रिस्टोअर करायच्या फोटोंवर क्लिक करून सिलेक्ट करा.
त्यानंतर रिस्टोअर बटणावर क्लिक केल्यानंतर सर्व फोटो रिकव्हर होतील.
आयफोनवरसुद्धा अशाच पद्धतीनं फोटो रिकव्हर करता येतात. यासाठी फोनवर गुगुल फोटोजमध्ये ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर Bin पर्याय सिलेक्ट करा. त्यानंतर फोटो सिलेक्ट करून रिस्टोअऱ पर्याय निवडा. डिलिट झालेले फोटो त्यानंतर तुमच्या गॅलरीमध्ये दिसतील.
मोबाईलशिवाय वेबवरूनही गूगल फोटोज रिकव्हर करणं सोपं आहे. कॉम्प्युटरवरून 





https://photos.google.com/ वेबसाइट ओपन करा. तुम्ही मेल लॉगइन केला असेल तर गुगल फोटो ओपन होईल. त्यात पर्यायामध्ये ट्रॅश सिलेक्ट करा. तिथे फोटो सिलेक्ट करून रिस्टोअर पर्यायावर क्लिक करा.
डिलिट झालेले फोटो आणि व्हिडिओ ट्रॅश फोल्डरमध्ये 60 दिवसांपर्यंत राहतात. जर त्यापेक्षा जास्त वेळ झाला असेल तर ते रिकव्हर होत नाहीत. त्यामुळे चुकून फोटो डिलीट झाले तर वेळीच रिकव्हर करून घ्या.

No comments:

Post a Comment