माझी मराठी शाळा आपले सहर्ष स्वागत करीत आ

Pages

Saturday, April 2, 2022

संतोषवाडी शाळेची वाटचाल कौतुकास्पद

 



      संतोषवाडी शाळेची वाटचाल कौतुकास्पद  

       :आमदार मा.सुरेशभाऊ खाडे 

*दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळू लागल्याने पालकांचा प्राथमिक शाळांकडे ओढा वाढला आहे. शिक्षकांनी आपल्या योगदानातून विविध शालेय आणि सहशालेय नाविण्यपूर्ण उपक्रमांद्वारे ओळख निर्माण केलेल्या संतोषवाडी शाळेची वाटचाल कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार आमदार मा.सुरेशभाऊ खाडे यांनी काढले*

संतोषवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आमदार सुरेशभाऊ खाडे व जि.प. सदस्या सरिताताई कोरबू यांच्या उपस्थितीत गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शाळाप्रवेशाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

 प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य ,गुलाबपुष्प व मिठाई वाटप करून  नूतन  विद्यार्थ्यांचे स्वागत करणेत आले.  याप्रसंगी मिरजेचे आमदार सुरेश भाऊ खाडे जि प सदस्य सरिता कोरबू  मॅडम सरपंच हणमंतराव गायकवाड ,अरुण दादा शिंदे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजाराम घोडके, उपसरपंच राजू मडलगी .सदस्या सुनीता नलवडे  .सुनील   मोहिते.डॉ. कोरबू,शिक्षिका सौ.सीमा वायदंडे ग्रामसेवक निंबाळकर,सुनॉल नलवडे,भीमसेन नाईकआदी मान्यवरउपस्थित होते.

पाहुण्याचे स्वागत मुख्याध्यापक रमेश वायदंडे यांनी केले.समारोप अमीर लकडे यांनी केले.यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.

No comments:

Post a Comment