माझी मराठी शाळा आपले सहर्ष स्वागत करीत आ

Pages

माझे उपक्रम

माझे उपक्रम
*उपक्रमाचे नाव : झाडाला राखी बांधणे।                                    जि. प.शाळा संतोषवाडी येथे रक्षाबंधन या   भाऊ -बहीण यांच्या प्रेमाची साक्ष देणाऱ्या सणादिवशी झाडाला राखी बांधणे हा नाविन्यपूर्ण उपक्रम घेतला. बहीण आपल्या भावाला राखी बांधून आपल्या रक्षणाची जबाबदारी देते,व आपल्या भावाला दीर्घायुष्य मागते.याची जाणीव ठेवून पर्यावरण रक्षणाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून मुलांमध्ये वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाचे महत्व रुजावे हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून उपक्रमाचे आयोजन करणेत आले,वृक्ष दत्तक घेऊन त्याच्या वाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करणेचे ठरले,प्रत्येक वर्गानुसार झाडाला राखी बांधली.झाडाचे रक्षण करून लोकांना झाडे लावण्यासाठी प्रवृत्त करणेचे ठरले.झाडे लावा झाडे जगवा अशा घोषणा देत मुलांनी राखी बांधत हा सण साजरा करणेत आला.*



 उपक्रमाचे नाव :पाढे पाठांतर 
जि .प.शाळा संतोषवाडी येथे दररोज परिपाठावेळी पाढेपाठांतर हा उपक्रम या घेतला जातो.यामध्ये दिनदर्शीकेनुसार आज जो दिनांक आहे आहे .तो पाढा घेतला जातो. यामध्ये जो विध्यार्थी त्या दिनांकाचा पाढा म्हणतो,त्याच्या पाठीमागे सर्व विध्यार्थी पाढा म्हणतात.त्या विद्यार्थ्याला सर्वांसमोर बोलावून त्याचे टाळ्या वाजवून अभिनंदन केले जाते,एखादा विध्यार्थी पाढा म्हणताना अडखला तरी त्याचा पाढा दुसऱ्या विद्यार्थ्यांची मदत घेऊन पूर्ण केला जातो, सर्व प्रकियेत सर्वाना संधी दिली जाते.मुलांना आनंददायीरित्या पाढे पाठांतर कसे होईल हे पहिले जाते,यामध्ये शाबासकी,चॉकलेट ,पेन्सिल असे बक्षिस देऊन प्रोत्साहन दिले जाते.परिपाठावेळी हे होत असलेने विध्यार्थी जास्तीत जास्त पाढे पाठ करू लागले.सुट्टीच्यावेळी मुले आपापसात पाढे म्हणून घेऊ लागली.*यामुळे गणितीप्रकिया झटपट होऊ लागली.मुले पटकन पाढा म्हणून गणिते सोडवू लागली* *

उपक्रमाचे नाव : दिंडी सोहळा 
जि. प.शाळा संतोषवाडी येथे आषाढी एकादशी दिवशी हा उपक्रम घेतला गेला.गावाला असलेल्या वारकरी संप्रदायाची थोर परंपरा,संतपरंपरेविषयी आदरभाव व्यक्त करणेसाठी दिंडी सोहळा हा उपक्रम घेतला जातो मुलांना विठ्ठल-रूक्मिणीची वेशभुषा केली जाते,काही मुले मुले संतमंडळी च्या पेहरावात असतात.दिंडीत पालखी सजवलेली असते त्यामध्ये वृक्षाची रोपे ठेवलेली असतात.पुस्तके ठेवलेली असतात ,सर्व ग्रामस्थ वारकरी पेहरावात टाळ मृदंगच्या विठ्ठल विठ्ठल झाडे लावा झाडे जगवा,बेटी बचाव बेटी पढाव अशा घोषणा देत गावातून दिंडी निघते,पाहण्यासाठी आलेल्या ग्रामस्थांना गोलरिंगण करून गीतातून शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले जाते.*

*उपक्रमाचे नाव ;प्लास्टिकमुक्ती साठी प्रबोधन*

 जि. प.शाळा संतोषवाडी येथे सामाजिक बांधिलकी म्हणून शासनाच्या स्वच्छ भारत अभियान ग्रामीण प्लास्टिकविरोधी धोरणाचा प्रचार व प्रसार होणेसाठी गावातून फेरी काढणेत आली, यामध्ये,प्लास्टिकमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो,प्राणी जीवन धोक्यात आले आहे,हजारो वर्षे होऊन सुद्धा प्लास्टिक चे विघटन होऊ शकत नाही.यासर्व गोष्टींचा विचार करून प्लास्टिकविरोधी घोषणा देणेत आल्या.एकच ध्यास ठेवूया,प्लास्टिक पिशव्या हटवूया,समृद्ध पर्यावरणाचे रक्षण करूया,या घोषणेने सर्वांना आकर्षित केले.याफेरीवेळी गावातील दुकाने,घरे यामध्ये असणारा प्लास्टिक कचरा गोळा करून ग्रामपंचायत तर्फे त्याची होळी करणेत आले,यावेळी सर्व ग्रामस्थांना प्लॅस्टिकमुक्तीची शपथ देणेत आली*

              सूर्यमाला
शाळेतील मुलांना ग्रह तारे समजावून सांगत असताना जर प्रत्यक्ष सूर्यमाला शाळेत अवतरते तेव्हा मुलांना प्रत्यक्ष अनुभूती बरोबर नवीन तंत्रज्ञानाचा वापर पाहून चक्क आश्चर्यचकीत व्हायला होते,आणि ही किमया आहे, एका अँड्रॉइड मोबाईल च्या' क्यूब  'ऍप ची . विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सूर्यमाला पाहता येत नाही तरी त्याची त्रिमितीय आकार प्रत्यक्ष पाहता येत आहे,हा उपक्रम जि. प.शाळा संतोष वाडी येथे राबविणेत आला.
शाळेतील तंत्रस्नेही शिक्षक रमेश वायदंडे यांनी सदर उपक्रम राबविला
सूर्यमालेची प्रत्यक्ष अनुभूती..आपल्या तळहातावर घेता येते
 3D इफेक्टसह दिसणारे हे दृश्य प्रत्येक विद्यार्थ्यास खगोलशास्त्राचे कुतूहल, जिज्ञासा निर्माण करणारे आहे. त्यामुळे प्रत्येक शाळेत प्रत्येक विद्यार्थ्यास ही अनोखी व विहंगम शैक्षणिक अनुभूती मिळावी यासाठी याचा वापर करावा. प्ले स्टोअर वरून 'मर्ज क्यूब' अॅप इंस्टॉल करून घ्यावे. खालीलप्रमाणे कृती केल्यास  मुलांना प्रत्यक्ष अनुभव देता येतो
               क्यूब डिजाईन पेपरच्या *पीडीएफ वरुन प्रिंट* काढावी. शक्यतो जाड (100+ gsm) पेपर वापरावा.
पेपरवरील सुचनेप्रमाणे *पेपर कट* करुन त्यापासून Merge Cube (घ
नाकृती खोका) बनवा.
Merge Cube app सुरु करुन *Phone Mode* मधून हातावर ठेवलेला क्यूब *Scan* करा.
आता तुमच्या फोन मध्ये क्यूब ऐवजी प्रत्यक्ष सूर्यमाला दिसेल. आपणास त्यापैकी कोणत्याही *ग्रहाला टच* करताच त्याचे सूक्ष्म निरीक्षण करता येईल.
कोणत्याही ग्रहाची अगर सूर्याची अधिक माहिती वाचण्यासाठी त्याच्याशेजारी दिसणाऱ्या *(i)* चिन्हावर क्लिक करावे.
सदर दृश्याचे शूटिंग करण्यासाठी वरच्या बाजूस असणाऱ्या *Record* या आयकॉन वर क्लिक करावे सदर दृश्य अनुभूती आपणास व्हिडीओ स्वरुपात जतन करता येते. तळ हातावर प्रत्यक्ष अनुभूती मिळत असलेने अॅप बद्दल प्रचंड उत्सुकता आहे.शिक्षक मित्रांनो,अँड्रॉइड मोबाईल प्रत्येकाकडे आहे.आपणही आपल्या शाळेवर सदरचा उपक्रम करून पाहावा आणि विद्यार्थ्यांना सूर्यमाला हाताळण्याचा आनंद द्यावा.

No comments:

Post a Comment