माझी मराठी शाळा आपले सहर्ष स्वागत करीत आ

Pages

सूर्यमाला हातात


*माझी शाळा,माझा उपक्रम'*
    *'सूर्यमाला माझ्या हातात'*

    नवीन तंत्रज्ञानाचा शोध नेहमीच शिक्षकांना नवनवीन उपक्रमांसाठी प्रोत्साहित करत असतात.त्यातूनच या उपक्रमाचा जन्म झाला,असे मला वाटते.
          सुर्यमालेसंदर्भात नवीन तंत्रज्ञानात डिजिटल असे मोबाईलच्या साहाय्याने आपल्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अध्ययन अनुभव  देत येईल असे app आहे.

       merge cube paper ची प्रिंट काढून चौकोनी ठोकळा तयार केला.प्ले स्टोर मध्ये जाऊन Galactic explorer for merge cube सर्च करून जी पहिली अँप्लिकेशन ती डाउनलोड केली.सर्व परमिशन अलो केले मग फोन मोड उघडून ठोकळा,कॅमेऱ्यासमोर आणला आणि चक्क सूर्यमाला मुलांच्या हातात आली.
   माझ्या सर्व विद्यार्थ्यांना जेंव्हा मी हा प्रयोग दाखवला.प्रत्येक मुलाच्या हातात सूर्य पाहूनच मुले आनंदून गेली.सूर्यमाला,त्यातील ग्रह कसे फिरतात?प्रत्येक ग्रहाचे वैशिष्ट्ये,अंतर,रंग,आकार,इ.तपशिलासह सूक्ष्म माहिती विद्यार्थ्यांना दिली.
    या उपक्रमामुळे  ग्रहमाला जवळून बघता आली , हाताळता आली.प्रत्येक ग्रहाचे सूक्ष्म निरीक्षण करता आले.
    शिक्षक मित्रांनो,अँड्रॉइड मोबाईल प्रत्येकाकडे आहे.आपणही आपल्या शाळेवर सदरचा उपक्रम करून पाहावा आणि विद्यार्थ्यांना सूर्यमाला हाताळण्याचा आनंद द्यावा.
    *टीप*: app घेतल्यानंतर नेटची गरज नसते.चित्राची print काढली तरी चालते.cube ची गरज नाही.आपणास उपक्रम कसा वाटला,जरूर कळवा.
   
        *श्री.रमेश वायदंडे*
   *जि.प.शाळा संतोषवाडी*

*⚛️⚛️⚛️⚛️⚛️⚛️⚛️⚛️⚛️⚛️⚛️⚛️⚛️


Merge cube






No comments:

Post a Comment