माझी मराठी शाळा आपले सहर्ष स्वागत करीत आ

Pages

सांगली

सांगली 
सांगली   हे शहर दक्षिण महाराष्ट्रात वसलेले आहे. सांगलीची इ.स.२००८ सालची लोकसंख्या५,०२,६९७ च्या आसपास आहे. हे शहर सांगली जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. ते कृष्णा नदीच्या काठावर वसलेले आहे.
मुख्य भाषा मराठी असून कन्नड, हिंदी आणि इंग्रजी भाषाही येथे बोलल्या जातात. आद्य मराठी नाटककार विष्णुदास भावे यांची ही जन्मभूमी आहे.सांगलीतील पटवर्धन संस्थानचे भव्य गणेश मंदिर सुप्रसिद्ध आहे.
सांगली शहर हे पहिलवानांसाठीही प्रसिद्ध आहे. हिंदकेसरी मारुती माने याच मातीतले.
सांगली येथील हळद बाजारपेठ ही अशियातील सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ मानली जाते. सांगली जिल्हा द्राक्षांच्या उत्पादनासाठीही प्रसिद्ध आहे. नुकतेच पलूसयेथे द्राक्षांवर प्रक्रिया करणारे वाईन पार्कही सुरू झाले आहे.
भडंग(एक प्रकारचे चुरमुरे) हा सांगलीकरांचा आवडता खाद्यपदार्थ आहे

नाव

कृष्णेचा रमणीय काठ लाभलेल्या सांगली या गावात १) गांव भाग २) पेठ भाग ३) गवळी गल्ली ४) चांभार वाडा ५) वखार भाग ६) जांभवाडी सहा गल्ल्या किंवा भाग असल्याने याचे नाव सांगली पडले असे मानले जाते. तसेच कन्नड भाषेतील पूर्वीच्या सांगलकी या नावाचे पुढे सांगली असे रूपांतर झाल्याचेही मानले जाते.
कृष्णा नदीच्या काठावर वसलेले सांगली हळद व्यापार आणि साखर कारखाने यासाठी प्रसिद्ध आहे. सांगली एक प्रमुख शिक्षण आणि आरोग्य केंद्र देखील आहे. सांगली जवळ कृष्णा नदीच्या खोऱ्यात पर्यटन स्थळांची ठिकाणे आहेत.सांगली हे मुंबई पासून ३९० किमी व बंगलोरपासून ७०० किमी अंतरावरील एक प्रमुख शहर आहे.
प्राचीन काळामध्ये, सांगलीचा प्रदेश कुंडल म्हणून ओळखला जात होता. या भागावर राज्य करणाऱ्या चालुक्य घराण्याची राजधानी होती. स्वातंत्र्यपूर्व काळात, सांगली हे पटवर्धन राजघराण्यातील एक राज्य होते. १९४८मध्ये, सांगली भारताच्या प्रजासत्ताकामध्ये विलीन करण्यात आले. सांगली ही भारतात हळद व्यापार राजधानी आहे; येथे साखर उद्योग लॉबी आहे. सांगली शहरात वसंतदादा साखर कारखाना हा आशिया खंडातील सर्वात मोठा साखर कारखाना आहे. सांगली द्राक्षांसाठीदेखील प्रसिद्ध आहे.
सांगलीत अनेक औद्योगिक वसाहती आहेत. सांगली-मिरज एमआयडीसी औद्योगिक क्षेत्र ही सुनियोजित औद्योगिक वसाहत आहे . या औद्योगिक क्षेत्रात इलेक्ट्रॉनिक ग्रीन हाऊस, हेल्थ क्लब, जलतरण तलाव, सॉफ्टवेअर प्रशिक्षण केंद्र, इत्यादी सोयी आहेत.
येथे मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत . अभियांत्रिकी व व्यवस्थापन संस्था तसेच अनेक सॉफ्टवेअर प्रशिक्षण संस्था आहेत. अभियंते, दूरसंचार सॉफ्टवेअर व्यावसायिक, आधुनिक दूरसंचार व इंटरनेट सुविधा आणि मोबाइल सेवा भरपूर प्रमाणात असल्याने सांगली हे माहिती तंत्रज्ञान उद्योग असणारे एक आकर्षक स्थान आहे.
सांगलीमध्ये रुंद रस्ते, रेल्वे जंक्शन, सायबर कॅफे, मल्टि-खाद्यप्रकार, खूप चांगले शिक्षण, आरोग्य, दूरसंचार आणि मनोरंजन सुविधा, हॉटेल्स वगैरे असल्याने ते एक आधुनिक शहर बनले आहे. सांगली शहर माहिती तंत्रज्ञान उत्कर्षाला आले आले आहे. शहरात सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क एकाच संकुलात उभारले आहे. सांगलीत भारतीय आणि परदेशी माहिती तंत्रज्ञान कंपन्या आणखी एक सॉफ्टवेअर पार्क 'उभारण्याच्या प्रयत्नात आहे.

शिक्षण

प्राथमिक व विशेष शिक्षण

सांगली शहरात अनेक नावाजलेल्य प्राथमिक शिक्षण संस्था आहेत
  • सांगली शिक्षण संस्था
सिटी हायस्कूल, हि. हा. रा. चिं. पटवर्धन हायस्कुल, रामदयाल मालु हायस्कुल, कन्यापुरोहित प्रशाला, म के आठवले विनय मंदिर, बापटबाल शिक्षण मंदिर
  • डेक्कन एजुकेशन सोसाइटी
सांगली हायस्कूल, आरवाडे हायस्कूल

महत्त्वाची महाविद्यालये

  • वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय (विश्रामबाग).
  • विलिंग्डन महाविद्यालय
  • लठ्ठे ऐज्यूकेशन सोसायटी
  • आप्पासाहेब बिरनराळे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर
  • शांतिनिकेतन महाविद्यालय
  • भारती विद्यापीठ
  • आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ फार्मसी
  • आण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनियरींग
  • पद्मभूषण वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलजी
  • चिंतामणराव कॉलेज ऑफ कोम्मर्स
  • के डब्लू सी
  • जी.ए. कॉलेज ऑफ कॉमर्स
  • राजारामबापू इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी
  • पद्मभूषण वसंतदादा पाटील दंत महाविद्यालय
  • मिरज मेडिकल कॉलेज
  • मथु बाई गरवारे महाविद्यालय
  • पतंगराव क़दम महाविद्यालय

पर्यटन स्थळे

बागेतील गणपती,हरिपर
  • सांगली शहराचे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांपासूनचे अंदाजे अंतर पुढीलप्रमाणे आहे.
क्र...पासूनअंतर(कि.मी.)
औरंगाबाद४५७
नागपूर७६३
पुणे२३१
मुंबई३९१
रत्नागिरी१७९

No comments:

Post a Comment