माझी मराठी शाळा आपले सहर्ष स्वागत करीत आ

Pages

आधार -पॅन LINKING


                   आधार -पॅन LINKING
  •  आधार आणि पॅन लिंकींगसाठी मुदतवाढ



  •  आधार कार्ड आणि पॅनकार्ड लिंक करण्यासाठी सरकारने मुदतवाढ दिली आहे. सरकारने याआधी आधार आणि पॅन लिंक करण्यासाठी 31 डिसेंबर 2019 हि शेवटची तारीख दिली होती.

  •  मात्र आता केंद्र सरकारने आधार आणि पॅन लिंक करण्याची मुदत 31 मार्च 2020 पर्यंत वाढवली आहे. या मुदतवाढीचा फायदा ज्यांनी अद्याप आधार आणि पॅन लिंक केलेले नाही अशांना होणार आहे.

  •  *पॅन-आधार कसा लिंक कराल?

  • ▪ भारतीय आयकर विभागाच्या https://www.incometaxindiaefiling.gov.in/home या वेबसाईटवर जा.

  • https://www.incometaxindiaefiling.gov.in/home

  • ▪ त्यानंतर तिथे डाव्या बाजूस तुम्हाला विविध पर्यायांची यादी दिसेल. त्यातील 'Link Aadhar' या पर्यायावर क्लिक करा.

  • ▪ त्यानंतर ऑनलाईन फॉर्म उघडा. त्यात आवश्यक माहिती भरावी लागेल. सर्व माहिती भरून झाल्यानंतर 'Link Aadhar' वर क्लिक करा.

  •  *लिंक झाल्याची खात्री करा :* पॅन-आधार लिंक होण्यास काही वेळ लागतो. त्यामुळं लिंक झालंय की नाही, हे पाहण्यासाठी याच ठिकाणी 'तुमचं पॅन-आधार लिंक झालंय का ते इथं पाहा' अशा आशयाचं इंग्रजी/हिंदीत लिहिलेलं दिसेल. त्यावर क्लिक करून तुम्ही तुमचं पॅन-आधार लिंक झालंय की नाही, ते पाहू शकता.
  •  दरम्यान, आधार आणि पॅनकार्ड लिंक करणे बंधनकारक असून असे न केल्यास सदरील पॅनकार्ड निष्क्रिय होणार असल्याची माहिती आयकर विभागाने वेळोवेळी दिली आहे.

1 comment: