माझी मराठी शाळा आपले सहर्ष स्वागत करीत आ

Pages

उत्तम आरोग्या साठी टिप्स

*_उत्तम आरोग्यासाठी ६५ महत्वाच्या सूचना_*
–––––––––––––––––––
१. दररोज न चुकता ३० मिनिटे शास्त्रोक्त पद्धतीने चालायाला जा . (लक्षात असू द्या “चालला तो चालला,थांबला तो संपला”)
२. दररोज कोणतेही एकतरी फळ खावे. (खास करून सफरचंद,संत्रे,केळे,पपई,सीताफळ,आवळा यापकी एखादे)
३. दररोज सकाळी अनुशापोटी कोमट पाण्यात एक चमचा लिंबाचा रस व एक चमचा मध घालून प्या.
४. प्रक्रिया केलेले पदार्थ खाण्याऐवजी शक्यतो पूर्ण जेवण करा.
५. कृत्रिम रंग व गोडी आणणारी साखर यांचा वापर करून केलेले घन / द्रव पदार्थ खाणे टाळा.
६. दुपारचे व रात्रीचे जेवणाची सुरुवात सॅलेड खाण्याने करा.
७. दिवसातून दोन वेळा ३ ते ५ मिनिटे दीर्घ श्वास घेण्याचा प्रघात ठेवा.
८. रात्री शांत झोप लागण्यासाठी ,झोपण्यापूर्वी मनाचा थकवा जाऊन मन प्रसन्न व्हावे यासाठी दोन मिनिटे एखाद्या सुगंधाचा भरभरून वास घ्या.
९. रात्री झोपण्यापूर्वी अर्धी मूठ आक्रोड खा.
१०. दिवसभर थोड्या थोड्या वेळाने भरपूर पाणी प्या. (दिवसातून किमान 5 लीटर)
११. सकाळी १०-१५ मिनिटे शुद्ध हवा व सूर्याचे कोवळे ऊन घ्या.
१२. दररोज १०-१५ मिनिटे जॉगिंग करा.
१३. दररोज १०-१५ मिनिटे पळा. (जागच्या जागी सुद्धा चालेल)
१४. जेवणातील पदार्थात भरपूर विविधता असू द्या,(म्हणजे प्रमाण जास्त नको तर जास्त पौष्टिक असावे)
१५. शांत चित्ताने हळूहळू संथपणे नीट चाऊन खा. (वाघ मागे लागल्यासारखे भराभरा न चावता नुसते गिळू नका)
१६. दोन जेवणाचे मध्ये छोटा उपहार घ्या.
१७. जीवनात नेहमी आनंद व हास्य असू द्या.
१८. सकाळची न्याहरी घेणे कधीच चुकवू नका.
१९. रात्रीची झोप किमान सात तास घ्या.
२०. रात्रीची झोपण्याची वेळ काटेकोरपणे पाळा. (शक्यतो रात्री १० वाजता झोपावे)
२१. आहारात तंतुमय (Fibber) पदार्थांचा वापर वाढवा.
२२. जेवणात रसरशीत नैसर्गिक रंग असलेले अन्न-पदार्थ असू द्या.
२३. योगासन वर्ग लावा व योगासने करा. किमान बारा सूर्य नमस्कार घाला.
२४. प्रेम व आनंद देणार्याै व्यक्ति सदैव तुमच्या सभोवताली असतील याची दक्षता घ्या
२५. लक्षात ठेवा आरोग्याला चांगले असणारे पदार्थ जिभेला आवडतीलच असे नव्हे.
२६. दोन वेळा ‘ग्रीन’ चहा प्या.
२७. घाम येईल इतका व्यायाम करा.
२८. आर्थिक तणाव टाळण्यासाठी किमान एक वर्षाच्या खर्चाला पुरेल एव्हढी रक्कम सेव्हिंग करा.
३०. आठवड्यातून दोनदा तरी ३० मिनिटे पुलअप – पुशअप व्यायाम करा.
३१. जेवणापुर्वी अर्धा तास अर्धी मूठ शेंगदाणे खा.
३२. वर्षातून एकदा ट्रेडमिल टेस्ट करून घ्या. 
३३. एक घास बत्तीस वेळा चाऊन खा.
३४. ‘ड’ जीवनसत्वयुक्त पूरक आहार (supplementary) घ्या.
३५. जेवणात दोन चमचे गाईचे तूप वापरा.
३६. म्हशीच्या दुधात जास्त स्निग्धांश असतो, त्या दुधा ऐवजी गाईचे कमी स्निग्धांश असलेले दूध वापरा.
३७. सकाळच्या न्याहरीत भाजणीचे थालीपीठ,सांजा,पोहे,भाज्याचे पराठे असे सकस व पौष्टिक पदार्थ असावेत.
३८. जेवणासोबत कृत्रिम थंड पेये घेणे टाळा.(कोका कोळा,थम्सअप,लीम्का इत्यादी.)
३९. जेवणापूर्वी हात-पाय साबणाने स्वच्छ धुवा व निर्जंतुक करा.
४०. नेहमी गरम व ताजे जेवण घेत जा.
४१. रोज थोडा आल्याचा छोटा तुकडा खा.
४२. रोज एक-दोन लसणाच्या कच्च्या पाकळ्या खा.
४३. साखरेचा वापर अतिशय कमी करा.
४४. पदार्थ बनवताना तेलाचा वापर शक्य तितका कमी करा. वरुन कच्चे तेल घेऊ नका. तळणीसाठी एकदा वापरलेले तेल पुन्हा वापरू नका
४५. एकाच प्रकारचे तेल न वापरता करडई,शेंगदाणा, सनफ्लॉवर,सोयाबीन,पाम,राईसब्रान,मोहरी,ऑलीव्ह अशी मिश्र तेल एकत्र करून वापरल्यास प्रत्येकातील काही चांगले गुणधर्म मिळून येतील.
४६. भातासाठी हातसडीचा किंवा बिनसडलेला तांदूळ वापरा.
४७. गिरणीतून गहू दळून आणताना त्यात सोयाबीन घाला. (एक किलोला १०० ग्राम)
४८. सकाळी दोन खजुर,राजगिरा लाडू / रोल ,मोरावळा खावा.
४९. आहारात नाचणीचा समावेश करा.
५०. शक्य तितके मिठाचे प्रमाण कमी करा. भाजी, आमटी, पदार्थ अळणी वाटल्यास वरून मीठ घालून घेऊ नका.
५१. जास्त खाणे टाळा . (लक्षात ठेवा “अति खाणे अन् मसणांत जाणे”)
५२. झोपण्यापूर्वी किमान ३ तास आधी काहीही खाऊ नये / जेवू नये.
५३. जेवणानंतर शतपावली घाला . (शंभर पावले चाला)
५४. जेवणानंतर लगेच झोपू नका.
५५. आठवड्यातून एक वेळ उपवास करा.
५६. दिवसातून १० मिनिटे मौनव्रत पाळा.
५७. आठवड्यातून किमान एकदा मैदानी खेळ खेळा.
५८. दिवसातून एकदा अर्धा तास चांगल्या पुस्तकांचे वाचन करा.
५९. सकाळी आंघोळीनंतर दहा मिनिटे प्रार्थना करा.
६०. सकाळी आंघोळीनंतर दहा मिनिटे “ध्यान” (Meditation) करा.
६१. इतरांबरोबर स्वत:ची तुलना कधीही करू नका.
६२. तुमच्या आवडीचेच काम करा.
६३. नावडते काम / नोकरी ताबडतोब सोडा.
६४. सदैव तुमच्या कुटुंबियांच्या संपर्कात / सान्निद्ध्यांत रहा.
६५. मित्रांच्या सान्निद्ध्यांत रहा.

No comments:

Post a Comment