माझी मराठी शाळा आपले सहर्ष स्वागत करीत आ

Pages

U-TUBE चा VDO कसा ब्लॉग वर घ्यावा

💐यु-ट्युबचा VDOआपल्या ब्लॉग वर कसा घ्यावा?💐 यु-ट्युब ही सध्याची विडिओ पाहण्याची जगातील प्रसिद्ध वेबसाइट आहे. या वेबसाइटवर आपण आपले सर्व विडिओ अपलोड करु शकतो. त्याच प्रमाणे यु-ट्युबवर वापरलेले निरनिराळे विडिओ आपण आपल्या वेबसाइटवर देखिल वापरु शकता. यु-ट्युबचा विडिओ आपल्या संकेतस्थळावर वापरण्याची पद्धत खाली दिली आहे. आपणास जो विडिओ हवा असेल तो यु-ट्युबवर चालू करा. विडिओच्या वर असलेल्या ' *Share*या बटणावर क्लिक करा. आता त्यामधिल *Embed* या बटणावर क्लिक करा. आता खालील एका छोट्या चौकोनात आपणास त्या विडिओचा कोड दाखविला जाईल. हा कोड कॉपी करा आणि आपल्या संकेतस्थळामध्ये ज्या ठिकाणी हा विडिओ हवा असेल तेथे हा कोड पेस्ट करा. आपणास जर ठराविक आकारामध्ये विडिओ हवा असेल तर त्याप्रमाणे कोड मधील width & height यामध्ये बदल करुन त्याठिकाणी विडिओचा आकार ठरवून आपण कोड वापरल्यास त्या आकारामध्ये विडिओ दिसू लागेल. 💐💐💐💐💐💐

No comments:

Post a Comment