जिल्हा परिषद शाळा संतोषवाडी येथे डॉ. सर्वपल्ली राधाकृषणन् जयंती शिक्षक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी त्यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच हणमंतराव गायकवाड यांच्या हस्ते करणेत आले.गुरुजनांविषयी आदरभाव व्यक्त करून त्याच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे असे प्रतिपादन सरपंच गायकवाड यांनी केले.शाळेतील कु.समीक्षा घोडके, अंश गायकवाड, अर्णव वाघमारे आदी विध्यार्थ्यांनी राधाकृष्णन यांच्याविषयी माहिती सांगितली. शालेय कामकाजाचे नेटके नियोजन इयत्ता ४ थी मधील विद्यार्थ्यांनीकेले.जेष्ठ नागरिक महादेव भगत आणि दादा वाघमारे वारकरी यांच्या हस्ते शाळेतील शिक्षकांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करणेत आला. यावेळी सरपंच हणमंतराव गायकवाड. क्लार्क सुनील नलवडे,केरबा मोहिते,माणिक मोहिते शिक्षक अमीर लकडे व सौ.सीमा रमेश वायदंडे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार केला.मुख्याध्यापक रमेश वायदंडे यांनी आभार मानले.
![]() |
Thanks for this article. Its very informative and amazing.
ReplyDelete