माझी मराठी शाळा आपले सहर्ष स्वागत करीत आ

Pages

Saturday, January 30, 2021

रेशन कार्ड कसे अपडेट कराल ?

 केंद्र सरकारने नुकतीच 'वन नेशन, वन रेशन कार्ड' (One Nation One Ration Card) योजना लागू करण्याची घोषणा केली आहे. रेशन कार्डमध्ये कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या नावाची नोंदणी करायची राहिली असल्यास ती कशी करायची, घरबसल्या रेशन कार्ड (Ration card) कसं अपडेट करायचं हे जाणून घेऊया

सर्वात आधी भारत सरकारच्या Www.pdsportal.nic.in या लिंकवर जा.


- यानंतर राज्यांची नावे असलेल्या टॅबवर क्लिक करा.


- यानंतर नवीन टॅबवर राज्यांची यादी येईल.


- तुम्ही ज्या राज्यात राहत आहात त्याची निवड करा.


- यानंतर नवीन पेज ओपन होईल.


त्यानंतर घरबसल्या रेशन कार्डमध्ये (Ration card) माहिती अपडेट करण्यासाठी संबंधित राज्याच्या अन्न पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जा. पहिल्या वेळेस वेबसाईटवर लॉगिन आयडी तयार करावा लागेल. यामध्ये जी माहिती भरायची आहे ती भरून सबमिट या पर्यायावर क्लिक करायचे आहे. यानंतर याची एक प्रिंट तुमच्याकडे बाळगा.


याच पद्धतीने तुम्ही तुमचा मोबाईल क्रमांक (Mobile Number) देखील अपडेट करू शकता. यासाठी तुम्हाला सर्वात आधी nfs.delhi.gov.in/Citizen/UpdateMobileNumber.aspx या लिंकवर जावे लागेल. त्यानंतर Update Your Registered Mobile Number हा पर्याय दिसेल. यात तुम्हाला कुटुंब प्रमुखाचा आधार क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर कुटुंब प्रमुखाचे नाव टाकून सर्वात शेवटी जो मोबाईल क्रमांक अपडेट करायचा आहे तो टाकायचा आहे. हा क्रमांक टाकून सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक अपडेट होईल.


No comments:

Post a Comment