माझी मराठी शाळा आपले सहर्ष स्वागत करीत आ

Pages

Friday, May 29, 2020

ऑनलाइन पैनकार्ड कसे काढाल ?



        ऑनलाइन पॅनकार्ड
केंद्रीय प्रत्यक्ष बोर्डाने (CBDT)  दिलेल्या माहितीनुसार केवळ , ज्यांच्याकडे वैध आधार क्रमांक आहे , तसेच त्यांचा मोबाइल नंबरही आधारसोबत जोडण्यात आलेला आहे.अशा नागरिकांसाठी ही ऑनलाइन पॅनकार्ड सुविधा उपलब्ध आहे फेब्रवारी 2020 मध्येच या सुविधेचे बिटा व्हर्जन सुरू करण्यात आले होते. आयकर विभागाच्या फायलिंग पोर्टलवर ट्रायल बेसिसवर ही सुविधा सुरू करण्यात आली होती. मात्र आता ही योजना अधिकृतरित्या लाँच करण्यात आली आहे. पॅन कार्ड देण्याची ही प्रक्रिया पूर्णपणे पेपरलेस असणार आहे. हे ई-पॅन कोणत्याही शूल्काशिवाय अर्जदारांना जारी केले जाईल. सीबीडीटीने यासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार आयकर विभागाने ही योजना डिजिटल इंडिया अंतर्गत लाँच केली आहे.
ऑनलाइन पॅनकार्डसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया
तुम्ही जर ऑनलाइन पॅनकार्डसाठी अर्ज करणार असाल तर आयकर विभागाच्या e-Filing पोर्टल वर जाऊन “Instant PAN through Aadhaar” मध्ये दिसणाऱ्या “Quick Links” वर तुम्हाला क्लिक करावे लागेल.

या पेजवरील “Get New PAN” या पर्यायावर क्लिक करा

तुम्हाला याठिकाणी तुमचा आधार क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर एक ओटीपी जेनरेट करण्यासाठी कॅप्चा कोड देखील टाकावा लागेल. तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर ओटीपी पाठवला जाईल. ज्याला तुम्हा वैध करावा लागेल.

पुढील टप्प्यात आधार कार्डची माहिती वैध करावी लागेल.

तुम्हाला तुमचा Email देखील वैध करण्याची गरज आहे.

यूनिक आयडेंटिटी अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) कडून e-KYC डेटा वैध केल्यानंतरच तुम्हाला इनस्टंट पॅन दिले जाईल. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याकरता कमीत कमी 10 मिनिटे लागतील.

यानंतर “Check Status/ Download PAN” वर क्लिक केल्यानंतर PDF फॉरमॅटमध्ये तुम्ही पॅन डाऊनलोड करू शकता.

दरम्यान एक गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे की या प्रक्रियेतून पॅन त्यांनाच मिळेल ज्यांच्याकडे आधीच पॅन नाही आहे. त्याचप्रमाणे तुमचा आधार आणि मोबाइल नंबर लिंक असणे गरजेचे आहे. आधारवर जन्मतारीखही असणे आवश्यक आहे.

No comments:

Post a Comment