माझी मराठी शाळा आपले सहर्ष स्वागत करीत आ

Pages

Monday, October 24, 2016

दिवाळी

दिवाळी
दिवाळीअथवा दीपावली हा प्रामुख्याने हिंदूतसेच दक्षिण आशिया  आग्नेय आशियातील अन्य धर्मीय समाजांत काही प्रमाणात साजरा केला जाणारा उत्सव आहे.
भारत], गयाना, त्रिनिदाद व टोबॅगो, फिजी, मलेशिया, म्यानमार, मॉरिशस, श्रीलंका, सिंगापूर  सुरिनाम या देशांमध्ये दिवाळीनिमित्त सार्वजनिक सुट्टी असते.
उपलब्ध पुराव्यांनुसार दिवाळी हा सण किमान तीन हजार वर्षे जुना आहे. पण त्या वेळी त्याचे स्वरूप आजच्यापेक्षा खूपच भिन्न होते. प्राचीन काळी हा यक्षांचा उत्सव मानला जायचा. दीपावलीचे मुळचे नाव यक्षरात्री असे होते हे हेमचंद्राने नोंदवले आहेतसेच वात्स्यायनाच्या कामसूत्रातही नोंदलेले आहे. नील्मत पुराणात या सणास दीपमाला असे म्हटले आहे.कनोजाचा राजा हर्षवर्धन याने नागानंद नाटकात या सणाला दीपप्रतिपदुत्सव असे नाव दिले आहे.  अंधाराला चिरून प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो. निसर्गाने पावसाळ्यात भरभरून दिलेल्या समृद्धीच्या आनंद उत्सवाचाकृतज्ञतेचा हा सोहळा असतो. या दिवशी सायंकाळी दारात रांगोळ्या काढून पणत्या लावतातघरांच्या दारात आकाशदिवे लावतात.महाराष्ट्रातील काही ठिकाणी लहान मुले या काळात मातीचा किल्ला तयार करतात.त्यावर मातीची खेळणी मांडतात. धान्य पेरतात. यामागची परंपरा कशी व केंव्हा सुरु झाली याची नोंद नाहीपण लहान मुलांच्या हौसेचा भाग म्हणून याकडे पाहता येते.यानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रेरणा मुलांच्या मनात जागी रहायला मदत होते

फटाके

अशा प्रकारे जैन समाज सणा-उत्सवाच्या वेळीही आपलीच परंपरा जपण्याचा आणि खाद्यसंस्कृती टिकवण्याचा प्रयत्‍न करतात. मात्रसुशिक्षित जैन मंडळी जीवितहिंसा टाळून पर्यावरणरक्षणालाही हातभार लागावा म्हणून सार्वजनिक ठिकाणी नाहीच पण घरीही फटाके वाजवत नाहीत

भाऊबीज

कार्तिक शुद्ध द्वितीयेस भाऊबीज हा सण साजरा केला जातो.
हा दिवस म्हणजे शरद ऋतूतील कार्तिक मासातील द्वितीया. द्वितीयेचा चंद्र आकर्षक व वर्धमानता दाखवणारा आहे. तेव्हा `बीजेच्या कोरीप्रमाणे बंधुप्रेमाचे वर्धन होत राहो', ही त्यामागची भूमिका आहे.आपल्या मनातील द्वेष व असूया निघाल्यामुळे सर्वत्र बंधुभावनेची कल्पना जागृत होतेम्हणून त्याकरिता हा भाऊबीजेच्या सण आहे. बंधु-भगिनींचा प्रेमसंवर्धनाचा हा दिवस आहे.


या दिवशी बहिणीच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते. भाऊ मग ओवाळणीच्या ताटात 'ओवाळणीदेऊन बहिणीचा सत्कार करतो.

No comments:

Post a Comment